Sangli Accident News
Sangli Accident News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: सांगलीत भरधाव ट्रकची ST बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

विजय पाटील

Sangli News: सांगलीतून एक भीषण अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. सांगलीतील जत मुचंडी रोडवर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामधील जखमींना विजापूर, जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील जत मुचंडी रोडवर एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. एसटीमधील २२ प्रवासी जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

अपघात कसा झाला?

एसटी बस ही सांगोलाहून विजापूरला जात होती. यावेळी मूचंडी नजीक हा अपघात झाला. एसटी बसला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना विजापूर,जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयाजवळ जखमींचे नातेवाईक पोहोचले असून त्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच जत पोलीस आणि एसटी मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देवदर्शनाहून परतणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू

नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला. वाळूने भरलेल्या ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

Today's Marathi News Live : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

SCROLL FOR NEXT