Heat Wave Latest Marathi News  Saam TV
महाराष्ट्र

चिंताजनक! मार्चमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताने 21 जणांचा मृत्यू

राज्यात 2020-2021 मध्ये उष्णतेमुळे मृत्यूची नोंद झाली नसली तरी 2016-2019 मध्ये 43 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्टात मार्चमध्ये उष्माघाताने 300 हून अधिक नागरिक आजारी पडले आहेत तर 21 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या (Maharashtra) आरोग्य विभागाने दिली आहे. मृत्यूंपैकी सात नागपूर, चार जळगाव, तीन अकोला आणि दोन जालना (Jalna) जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. (Heat Wave Latest Marathi News)

हे देखील पाहा -

नागपूर विभागात सर्वाधिक 262 उष्णतेशी संबंधित आजारांची नोंद झाली आहे. उष्माजन्य आजाराच्या एकूण 338 रुग्णांपैकी अकोल्यातील 29, पुण्यातील 21, नाशिकमधील 14, औरंगाबादमधील 10, लातूर आणि कोल्हापूर विभागातील प्रत्येकी एक रुग्ण असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्यात 2020-2021 मध्ये उष्णतेमुळे मृत्यूची नोंद झाली नसली तरी 2016-2019 मध्ये 43 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT