Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News: भयंकर! धावत्या ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाज्यात उभा असताना तोल गेला अन् अनर्थ घडला

Train News: कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेसमधून २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकेत असे २० वर्षीय तरुणाचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाच्या मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दिवा-रत्नागिरी या कोकणात जाणाऱ्या पॅसेजर एक्सप्रेस ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू जागीच मृत्यू झालाय. संकेत गोठल असे २० वर्षीय तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील उंदेरी वाजेवाडी गावाजवळ ता.२४ जून सोमवारी सकाळी घडली. सोमवारी उंदेरी गावाजवळ दिवा- रत्नागिरी ही पॅसेजर ट्रेन (Train)जात होती. दरम्यान या ट्रेनमध्ये २० वर्षीय संकेत दादर ते खेड असा प्रवास करत होता. मात्र दरवाजात उभा असताना त्याच्या अचानक तोल गेलाने तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला. खाली पडल्याने संकेतला दुखापत झाल्याने त्याच्या जागीच दुर्देवी अंत झाला.

संकेतच्या अपघाताची माहिती तात्काळ महाड तालुका पोलिस(Police) ठाण्यात देण्यात येते. त्यानंतर महाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच संकेतचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

संकेतचा अपघात झालेले ठिकाण मुख्य वस्तीपासून लांब होते. साधारण दोन किलोमीटर अंतर पार करत रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात संकेतच्या जवळ मिळालेल्या तिकीटावरुन तो मुंबई(Mumbai) ते खेड असा प्रवास करत असल्याचे समजले तसेच संकतेजवळून मिळालेल्या मोबाईलवरुन त्यांची ओळख समजण्यात आली. सध्या या प्रकरणाबाबात महाड पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधं न घेता डायबिटीज होईल बरा! स्वयंपाकघरातील 'हे' ३ मसाले रक्तातील साखर करतील कमी

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Shocking : घरात कोणीही नसताना सैतान जागा झाला, तोंड,हात बांधून भावाकडून बहिणीवर बलात्कार

Work from home health risks: लॅपटॉपची उष्णता शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनी दिला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा

सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT