2 thieves arrested for stealing 4 motorcycles; DYSP Special Squad best Performance दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : ४ मोटारसायकल चोरणाऱ्या २ चोरट्यांना अटक; DYSP च्या विशेष पथकाची कामगिरी

2 thieves arrested for stealing 4 motorcycles : चौकशी दरम्यान त्यांनी लातूर शहरातील विविध भागातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले.

दिपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात लातूरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना (Bike Theft) अटक केली आहे. या दोन्ही चोरट्यांकडून चार दुचाक्या (Bike) जप्त करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील चोरीच्या घटनात मोठी वाढ झाल्याने लातूर (Latur) शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली. (2 thieves arrested for stealing 4 motorcycles; DYSP Special Squad best Performance)

हे देखील पाहा -

पोलीसांना मिळालेल्या या गोपनीय माहितीवरून औसा तालुक्यातील तुंगी येथील ३५ वर्षीय करीम पाशा अमनजी शेख आणि ३८ वर्षीय गणीपाशा अमनजी शेख यांना स्क्रॅप मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी लातूर शहरातील विविध भागातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकलींपैकी ४ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणा पोलीस आणखन तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT