2 lakhs names missing in voter list of nagpur constituency says bjp president kukade Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur Constituency : 2 लाख मतदार वंचित, अधिकाऱ्यांची बेफिकिरी; नागपूर भाजप शहराध्यक्षांच्या दाव्यानं अधिकारीच गोत्यात!

ज्या मतदारांना मतदान करता आले नाही किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशा मतदारांकडून माहिती गोळा केली जात आहे अशी माहिती भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur Lok Sabha Election :

नागपूर येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास प्रत्येकी 15 ते 20 हजार अशा पद्धतीने नागपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन लाख मतदारांची नावे गहाळ झाल्याचा दावा आज (मंगळवार) भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केला. याबद्दल प्रशासकीय अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी करत याबाबत प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे कुकडे यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

नागपुरात झालेला कमी मतदान आणि त्यासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर खापर फोडलं जात आहे. हा सारा प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषद घेत दोषी कारवाईची मागणी केली.

कुकडे म्हणाले नागपूर लोकसभा मतदारसंघांत सुमारे 2 लाखाच्या घरात मतदारांची नावे गहाळ झाली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांत सुमारे 20 हजार नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा')

ज्या मतदारांना मतदान करता आले नाही किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशा मतदारांकडून माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती प्राप्त हाेताच प्रसंगी भाजप विधी आघाडीकडून न्यायालयात दाद मागणार आहाेत असेही बंटी कुकडे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT