दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाखांची मदत Saam tv
महाराष्ट्र

दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाखांची मदत

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या नावानं बार्टीमार्फत Barty हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये

उस्मानाबाद : दहावीत (10th) 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या SC विद्यार्थ्यांना 2 लाखांची मदत करण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे. उस्मानाबादेत आयोजित एक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ही मदत केली जाणार आहे. (2 lakh help to students who get more than 90 percent marks in 10th)

याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 11 वी व 12 वी या दोन वर्षात व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येकी 1 लाखप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं बार्टीमार्फत हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बार्टीच्या नियामक मंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार, कंत्राटी किंवा खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारीसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी) या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचे प्रक्षेपण

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

India vs Australia Hobart T20I: वॉशिंग्टनची अति 'सुंदर' खेळी; टी२०मालिकेत १-१ ने बरोबरी

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Politics: शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर...,शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला सज्जड दम? VIDEO

SCROLL FOR NEXT