तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा; सोनिया गांधींचे पक्षाला आदेश

देशात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आतापासूनच तयारी सुरू करण्यात यावी.
तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा; सोनिया गांधींचे पक्षाला आदेश
तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा; सोनिया गांधींचे पक्षाला आदेश Saam Tv
Published On

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पक्षाचे सरचिटणीस General Secretary आणि राज्य प्रभारी ( State in charge) यांची बैठक घेतली. कोरोना Corona Virus महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्षनेत्यांना तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता त्वरेने तयारी करण्याची आणि त्या दृष्टीने विशेष पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. (Get ready for the third wave; Sonia Gandhi orders the party)

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांचे या वर्षाअखेरपर्यंत लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी दैनंदिन लसीकरणात तीन पटीने वाढ करण्याची गरज आहे. असे केल्यास या वर्षाअखेर पर्यंत 75 टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकते, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, याबाबत तातडीने उपाय योजना सुरू करायला हव्यात, विशेष करून लहान मुलांची दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जर एखाद्या ठिकाणी कोणाला लसीसंबंधी काही शंका असेल तर ती दूर करण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, यामुळे लसीचा अपव्यय होणार नाही नाही. असेही सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा; सोनिया गांधींचे पक्षाला आदेश
तुमचा फोन तुमचे संभाषण ऐकत आहे काय ? जाणून घ्या

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आतापासूनच तयारी सुरू करण्यात यावी. येत्या काही महिन्यांत लहान मुले या साथीच्या आजाराला बळी पडू शकतात, त्या दृष्टीने मुलांना या आजारपासून दूर ठेवण्यासाठी याबाबत त्वरित सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. दरम्यान, यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम सर्व सामान्य नागरिक, शेतकऱ्यांवर होत आहे, यावर प्रकाश टाकण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. बेरोजगारीत वाढ होत आहे, अर्थव्यवस्था कोलमडली असून तूर्तास तरी ही कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com