जाफ्राबाद पोलिसांकडून 2 लाख 60 हजाराचा गांजा जप्त
जाफ्राबाद पोलिसांकडून 2 लाख 60 हजाराचा गांजा जप्त लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जाफ्राबाद पोलिसांकडून 2 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

लक्ष्मण सोळुंके

जालना - शहरातून जाफ्राबाद कडे ऑटोरिक्षातून दोन इसम गांजाची तस्करी करत असल्याची माहिती जाफ्राबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जाफ्राबाद पोलिसांनी जालना शहराकडून येणाऱ्या मार्गावर सापळा लाऊन नाकाबंदी केली असता रेपाळा फाट्याजवळ संशयित ऑटोरिक्षा जाफ्राबादच्या दिशेने येत असल्याचे दिसताच ऑटोरिक्षाची झाडाझडती घेतली.

हे देखील पहा -

या ऑटोरिक्षामध्ये 2 लाख 60 हजाराचा गांजा,आढळून आल्याने रिक्षा चालक व त्या रिक्षा बरोबर असलेल्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेण्यात आले. हा गांजा अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिल्या नंतर त्यांच्या विरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाची बंदी असतांना तस्करी व विक्री करण्याच्या हेतूने घेऊन जात असल्याचा प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी राजू बाळा मोहिते,रिझवान खान जाहिर खान, जुम्मा मस्जित जुना जालना यांना अटक करत त्याच्या ताब्यातून 2 लाख 60 हजाराचा गांजा,1लाख रुपय किंमत असलेली ऑटोरिक्षा, 70 हजार रुपय किंमत असलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक जायभय, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन हे करत असून या प्रकरणी गांजा तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT