2 lakh 21 thousand lamps to be distributed in buldhana memory of karsevak saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : बुलढाण्यात उपक्रम, कारसेवक वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप

Ayodhya Ram Mandir : नेमाने कुटुंबीयांना अयोध्येतील साेहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

संजय जाधव

Buldhana News :

प्रभू श्रीराम जन्मभूमित प्रताष्ठापित व्हावेत यासाठी कारसेवेत झोकून देणा-यांमधील बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर येथील पहिल्या कारसेवेतील कारसेवक (kar sevak) अरविंद उमाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हाभरातून २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप केले जाणार आहे. हा उपक्रम उमाळकर यांचे चिंरजीव अजय उमाळकर यांनी राबविला आहे. (Maharashtra News)

येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी उमाळकर यांचे वडील आज हयात नाहीत याची खंत त्यांचे चिरंजीव अजय यांना लागून राहिली.

आपल्या वडिलांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी अजय उमाळकर यांनी २ लाख २१ हजार दिवे वाटपाचा संकल्प केला. बुलढाणा जिल्हाभरातील ४ हजार कुटुंबीयांना प्रत्येकी पाच दिवा वातीचा संच दिला जाणार आहे असे अजय उमाळकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. ते म्हणाले दिव्यांच्या पॅकिंगचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. लवकरच जिल्हाभरात या दिव्यांचे वाटप केले जाईल.

नेमाने कुटुंबीयांना निमंत्रण

6 डिसेंबर 1992 साली अयोध्येत कार सेवेतील बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील विष्णुदास नेमाने यांना त्या ठिकाणी वीर मरण आले होते. येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण त्यांच्या कुटुंबीयांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT