Ganesh Visarjan 2022 Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: गणेश विसर्जनाला गालबोट! दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

गणपती पाण्यात नीट बुडाला की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पाण्यात गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या (Corona) 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. गेल्या 10 दिवसांपासून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच यवतमाळच्या (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी येथील महागाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.

हे देखील पाहा -

आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रात्री दरम्यान घडली आहे. गोकुळ टेटर आणि सोपान गावंडे अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत.

शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघे जण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जन ही करण्यात आले आणि त्यानंतर सर्वे आपापल्या घरी देखील परले. मात्र, गोकुळ आणि सोपान गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी परत नाल्यावर गेले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण नाल्यात बुडाले. दोघांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Photos: अभिनेत्री अमृता खानविलकरचं प्रतिबिंब, सौंदर्यातून खुलून आलं

Nanded : शासकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकाची रुग्णाच्या वडिलांवर दमदाटी, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी

Actress Death : सिनेसृष्टीला दुहेरी धक्का, प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; चाहत्यांवर शोककळा

Cough Syrup : बंदी केलेले कफ सिरप विक्रीला; भंडाऱ्यात तीन औषध विक्रेत्याकडून सिरप जप्त

SCROLL FOR NEXT