संजय राठोड
यवतमाळ - जिल्ह्यात वाघांची (Tiger) संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा अर्थ जंगल समृद्ध असून वाढत असलेल्या वाघांच्या संख्येवरून याची पावती मिळते. ही बाब सुखद असली तरी वाघ आणि मानव हा संघर्ष कायम पेटतोय. त्यामुळे या वादावर दीर्घकालीन उपाययोजना करून वाघांना त्यांच्या अधिवासाठी पर्याप्त क्षेत्र कसे उपलब्ध होईल, याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. चार वर्षाच्या कालावधीत आता पर्यंत १९ जणांचा बळी वाघाने घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वनसंपदा आणि मुबलक पाणी उपलब्ध आहे.परंतू मानवी हव्यासातून आणि विविध प्रकल्पाच्या निर्मितीकरिता जंगलावर दाव वाढला. काही भागात तर जंगलता अतिक्रमण करून शेती देखील केली जाते.त्यामुळे वाघ मानवी वस्तीत आला की,मानव वाघाच्या वस्तीत गेला हा संशोधनाचा विषय बनला आहे.
जिल्ह्यातील पांढरकवडा उपविभागात सर्वाधिक वाघ आढळून येतात. टिपेश्वर अभयारण्यानंतर झरी-जामणी, मुकुटबन,पाटण,माथर्जुन परिसरात जवळपास आठ किलोमीटर परिघातील जंगलात वाघाचे संवर्धन होत आहे. जामणी परिसरात मागील दोन वर्षात वाघिणीने सात बछड्याला जन्म दिला.त्या बछड्यांची वाढही झाली.मात्र या भागात जंगल कमी असल्याने आणि वाघाला स्थलांतर करण्यासाठी पुढे जागा नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
हे देखील पहा -
२०१८ मध्ये देशात गाजला नरभक्षी अवनी प्रकरण
पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या विघिणीला नरभक्षी ठरवून ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले होते.तद्नंतर हैद्राबाद येथील शिकारी नवाब शफथ अली खान ह्याचीशी करार करण्यात आला.अवनीला नवाबचा मुलगा असगर अली ह्याने गोळी घालून मारले होते. त्यानंतर हा प्रकरण देशभरात गाजला होता. या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.सर्व बाजु ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रथम वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात यावे.तसे न झाल्यास ठार मारण्यात यावे.विशेष म्हणजे ठार केलेल्या अवनी ने १४ व्यक्तींचा शिकार केल्याचा आरोप होता.
यवतमाळ जिल्ह्यात आता पर्यंत एवढ्या १९ जणांना बळी
जिल्ह्यात वाघ आणि मानव संघर्ष काही नविन नाहीत.मात्र गेल्य चार वर्षात आतापर्यंत १९ जणांना जीव गमवावे लागले आहे. २०१८-१९ मध्ये अवनी वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला.२०२०-२१ या वर्षात वाघांनी चौघांचा आणि २०२१-२२ मध्ये एकाचा बळी गेला असे मिळून एकुण १९ जणांचा बळी गेला आहे.यात २०२१ मध्ये अस्वलीने देखील दोघांचा बळी घेतल्याचे नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.