Teacher's Job Saam Tv
महाराष्ट्र

Teacher's Job: राज्यात १७ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त; नवे शैक्षणिक वर्ष अवघ्या २ महिन्यांवर

Maharashtra Primary Teacher Posts are Vacant: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मात्र अद्याप जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही.

डॉ. माधव सावरगावे

Teacher's Job News : राज्यात सध्या १७ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीचा अहवाल सादर करा असे निर्देश संभाजीनगर खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करावं लागणार आहे. (Latest Marathi News)

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मात्र अद्याप जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. शिक्षकांची भरती हा मूळ मुद्दा आहे असे खंडपीठाने नमूद केले आहे.

खंडपीठाच्या २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक (Teacher) भरतीसाठीच्या 'टीएआयटी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने १३ ऑक्टोबर रोजी खंडपीठात सादर केले होते.

त्यानुसार सरकारी वकिलांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. त्यावर खंडपीठाने शासनास वरीलप्रमाणे निर्देश दिले. या 'सुमोटो जनहित याचिकेवर दि. २८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे. २०१७ साली एकदाच टीएआयटी परीक्षा झाली होती. त्यानंतर ती परीक्षा (Exam) झाली नव्हती. तेव्हापासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही.

परिणामी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता राज्यात प्राथमिक शिक्षकांची जवळपास १७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, असे यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT