गणपती उत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या १५० फेऱ्या! विहंग ठाकूर
महाराष्ट्र

गणपती उत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या १५० फेऱ्या!

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० फेऱ्या सोडणार आहे.

विहंग ठाकूर

दिल्ली : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० फेऱ्या सोडणार आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० फेऱ्या आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले आले.150 train journeys to Konkan for Ganpati Festival

कोकणावर आजपर्यंत कित्येक संकट आलि आत्ताच्या पावसामुळे किंवा याच्या आधींच्या वादळामुळे अशी अनेक संकट जरी कोकणवासियांवर आली असली तर कोकणकरांचा आपल्या परंपरा आणि उत्सवांबाबत असलेल प्रेम सर्वश्रुत आहे कोणत्याही प्रसंगाला तोंड देत ते आपली परंपरा जपत सगळे उत्सव साजरे करतात आणि गणेश उत्सव म्हणजे तर सगळ्या महाराष्ट्राला भूरळ पाडणारा अशात मग कोकणकर कसे मागे हटतील आणि गणपति उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणारी गर्दी लक्षात घेता त्यांच्यासाठी रेल्वेच्या जास्त फेऱ्या केल्या जाणार आहेत त्या एकून १५० असणार आहेत.

72 फेऱ्या मध्य रेल्वेने आधीच जाहीर केल्या होत्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या असून, अश्या एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही.

तसेच मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: जागांचा निर्णय होण्याआधीच अबू आझमी यांचं मविआसंदर्भात मोठ विधान

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : काँग्रेसच्या चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra Election: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; मिलिंद देवरा देणार आदित्य ठाकरेंना टक्कर, कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT