Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : ऐन उन्हाळ्यात ४०० गावांची बत्ती होणार गुल्ल; १५ कोटी १५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत

Washim News : ३१ मार्चपर्यंत ही रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देणारं पत्र महावितरणकडून वाशीम जिल्हा परिषदेला देण्यात आलंय. त्यामुळं भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Disconnect Electricity Supply :

वाशिम जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकांची १५ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्यानं ३१ मार्चपर्यंत ही रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देणारं पत्र महावितरणकडून वाशीम जिल्हा परिषदेला देण्यात आलंय. त्यामुळं भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती आहे.

मार्च महिन्याचा शेवट असल्यानं महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ४०० ग्रामपंचायतींकडे थकीत असलेल्या १५ कोटीच्या वसुलीसाठी जिल्हा परिषदेला हे पत्र देण्यात आलंय.

जिल्हा रुग्णालयाची बत्ती होणार गुल

नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे देखील महावितरणाची तब्बल 1 कोटी 36 लाख 85 हजार 676 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून महावितरणकडून जिल्हा रुग्णाकडे वीज बिल थकबाकी वसुलीसाठी पाठपुरवठा सुरू आहे.

8 वर्षांपासून उभारलेलं आरोग्य केंद्रा वीजपुरवठा नसल्याने बंद

एकीकडे वीज बिलाची मोठी थकबाकी पडली आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी वीजपुरवठा होत नसल्याने मोठमोठी कामे रखडली आहेत. बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत विद्युत रोहित्र नसल्याने शोभेची वस्तू बनली आहे. गेल्या 8 वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून सदरील इमारत उभारण्यात आली होती. परंतु विद्युत पुरवठा नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊन भुर्दंड सहन करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT