Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

Eknath Shinde Brother News : साताऱ्यात सापडलेल्या १४५ कोटींच्या एमडी ड्रग्ज कारखान्याशी आपला किंवा शिंदे कुटुंबियांचा कोणताही संबंध नसल्याचे प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी

Eknath Shinde Satara Latest News Update : सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याची आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले आहेत. राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(Eknath Shinde brother drug factory controversy)

सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे. माझ्या जमिनीचा सातबारा गट १७ / १ अ असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट ४/१ असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक ३०/१० असा आहे. तसेच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती १५ ते १६ किलोमीटर लांब असल्याचेही प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या स्वतःच्या जागेवर कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नसून तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा माझा मानस आहे. ही जागा रणजीत शिंदे याला विकण्यात आली असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसेच रणजीत हा फरार झाला नसून गावातच आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुठेही रणजीत शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही. तसेच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इथे सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतही जेवण जात नव्हते हेदेखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे केवळ राजकिय द्वेषापोटी हे आरोप केले जात असून, माझा आणि माझ्या कुटुंबीयांचे नाव त्यात ओढून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचे प्रकाश शिंदे यांनी साधार स्पष्ट केले . उबाठा आणि काँग्रेसने याबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे, निराधार आणि खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांचा विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, अशा इशारा प्रकाश शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT