पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन!
पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन! Saam Tv
महाराष्ट्र

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन!

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरPandharpur तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्णांचीCorona Patients संख्या असलेल्या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लाॅकडाऊनLockdown जाहीर केला आहे.

हे देखील पहा-

यासंदर्भात पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आज संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 21 गावांमध्ये लाॅकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुढील 14 दिवसांसाठी हा‌लाॅकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. याशिवाय कोरोना चाचणी व व्हॅक्सिनेशन मोहीम राबवली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरवGajanan Gurav यांनी सांगितले.

मागील 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केला होता दहा दिवसाच्या कडक लाॅकडाऊन नंतर काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरही पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तालुक्यातील 21 गावांमध्ये लोक डाऊन चा निर्णय घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Today's Marathi News Live : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

SCROLL FOR NEXT