भाजपच्या 'त्या' कार्यकर्त्यांचा कल्याण भाजपने केला सत्कार

कल्याण मधील भाजपच्या 'त्या' कार्यकर्त्यांचा सत्कार करत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनाला डिवचले आहे.
भाजपच्या 'त्या' कार्यकर्त्यांचा कल्याण भाजपने केला सत्कार
भाजपच्या 'त्या' कार्यकर्त्यांचा कल्याण भाजपने केला सत्कारप्रदीप भणगे

कल्याण : कल्याणKalyan मधील भाजपच्याBJP 'त्या' कार्यकर्त्यांचा सत्कार करत भाजप आमदार गणपत गायकवाडGanpat Gaikwad आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनालाShivsena डिवचले आहे.काल केंद्रीय मंत्री नारायण राणेNarayan Rane यांच्या विरोधातील शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद कल्याण-डोंबिवली मध्ये देखील उमटले आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांच्यासह शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यानी काल कल्याण पश्चिमेकडील भाजपच्या कल्याण शहर शाखेवर दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि भाजपच्या एका कार्यकर्त्यांला मारहाण केली. याप्रकरणी काल बाजारपेठ पोलिसPolice ठाण्यामध्येStation गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.BJP felicitated the welfare of the workers

हे देखील पहा-

काल भाजप कार्यलयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिवसेनेने सत्कार केला होता.त्यानंतर आता शिवसेना नेत्यांचा प्रतिकार करणारे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रताप टूमकर Pratap Tumkar व वैभव सावंतVaibhav Sawant या दोन्ही कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यलयात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की घराचा जसा पालनकर्ता असतो तसा आमच्या कार्यालयाचे त्यांनी रक्षण केले आहे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचा सत्कार. पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला पाहिजे. हा सत्कार नसून सन्मान असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

भाजपच्या 'त्या' कार्यकर्त्यांचा कल्याण भाजपने केला सत्कार
मंगळसूत्राची केली चोरी; पण ते निघाले बेंटेक्स!

दरम्यान आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी त्यांनी शिवसेना माझ काहीही बिघडवू शकत नाही आणि कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला असल्याच वक्तव्य राणेंनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com