पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Nagpur school teacher assault during SSC exam : राज्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पेपर सुरू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारल्याचा प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरमधील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये या हल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूरमधील किदवई हाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज एका शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर दुसऱ्या एका शिक्षकाने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये राडा झाला. सगीर अहमद असे जखमी झालेल्या मराठी विषयाच्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सगीर अहमद यांचे बंधू आणि इतर सहकार्यानी आरोप केला आहे की शाळेतील मुख्याध्यापक माजीद खान पठाण आणि एका शिक्षकाने सगीर अहमद यांना त्यांच्या आजच्या उपस्थिती संदर्भात मस्टरवर स्वाक्षरी करण्यास थांबवले. याच मुद्द्यावरून वाद झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाला. यामध्ये सगीर अहमद गंभीर जखमी झाले आहेत. किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अल्पसंख्यांक दर्जा असलेली शिक्षण संस्था असून शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्तीचा वाद गेले अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्या वादामुळेच शाळेत शिक्षकांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे.
जळगावात हॉल तिकिट देण्यास नकार -
जळगावच्या चोपड्यात दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याचा प्रकार परीक्षेच्या पहिल्या दिवशीच समोर आला आहे. फी बाकी असल्यामुळे हॉल तिकिट दिले नसल्याचं सांगण्यात येत आहे. चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. हॉल तिकीट नसल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेला बसता येणार नाही, त्यामुळे पालकांनी शाळा गाठली. स्थानिक पत्रकारांनी हस्तक्षेप केल्यानंतर मुलीला शाळेकडून हॉल तिकिट देण्यात आले. केवळ फी बाकी असल्याने विद्यार्थिनीला हॉल तिकीट न देणाऱ्या या शाळेची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.