Amravati : परतवाडा- अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या 100 मेंढ्या Saam Tv
महाराष्ट्र

Amravati : परतवाडा- अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या 100 मेंढ्या

रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले आहे. 102 मेंढ्या ठार तर 40 जखमी झाले आहेत. अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून 6 किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास 150 मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

या अपघातामध्ये 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास राजस्थान मधील मेंढपाळ हे आपल्या मेंढया घेऊन परतवाडा ते अंजनगाव रस्त्यावर अंजनगाव कडे जात होते. या दरम्यानच परतवाडा वरून अंजनगाव सुर्जीकडे जाणारा भरधाव ट्रक या मेंढराच्या कळपात घुसला होता.

यामध्ये 102 मेंढ्या चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक मेंढ्या यामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरश या महामार्गावरून रक्ताचा सडाच पडला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल होऊन या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. दरम्यान ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडले गेल्याचा आरोप मेंढपाळाने केला आहे.

ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे. अमरावती परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून 6 किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास 150 मेंढराच्या कळपात भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या मेंढपाळांचे 10 लाखांचे नुकसान झाले असल्याचे मेंढपाळ सांगत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

Maharashtra News Live Update: “चैन पडेना आम्हाला!” म्हणत कुणाल सरमळकर यांचे ट्विट चर्चेत

Phlegm : गरम पाण्याच्या वाफेने खरंच छाती-फुफ्फुसांतील कफ बाहेर पडतो का?

Political News : मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Rajbhog Mithai Recipe: सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट राजभोग, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT