दारू साठी 10 रुपये दिले नाहीत...; वादातून मित्राने केली मित्राची हत्या! संजय जाधव
महाराष्ट्र

दारू साठी 10 रुपये दिले नाहीत...; वादातून मित्राने केली मित्राची हत्या!

पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवीत आरोपी एका तासात केले जेरबंद

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव

बुलढाणा: दारू पिण्यासाठी १० रूपये न दिल्याने मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाचा डोक्यात लाकडी राफ्टर मारून दोघांनी खून केल्याची घटना घडली आहे. काल (ता. २७) सायंकाळी मलकापूर शहरातील मुक्ताईनगर Muktainagar रोडवरील घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

तर पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास वेगाने तपास चक्रे फिरवित एका तासात आरोपींना अटक केली आहे. मलकापूर शहरातील मुक्ताईनगर रोडवर सरकारमान्य दारू विक्री दुकान असून या दुकानावर भागवत फासे (वय ५५) रा.हिंगणा काझी, विनोद लक्ष्मण वानखेडे (वय ४०), दिलीप त्र्यंबक बोदडे (वय ३५) दोघे (रा. सुभाषचंद्र बोस नगर) हे तिघे मित्र त्याठिकाणी दारू पिण्यास गेले होते.

यावेळी विनोद वानखेडे व दिलीप बोदडे या दोघांनी भागवत फासे यांच्याकडे दारू पिण्यासाठी १० रूपयांची मागणी केली. मात्र फासे यांनी पैसे दिले नाही. त्यानंतर फासे हे दुकानातून बाहेर आल्यानंतर वानखेडे व बोदडे या दोघांनी फासे यांनी पैसे न दिल्याचा राग डोक्यात ठेवून त्यांच्या डोक्यात लाकडी राफ्टर मारले. लाकडी राफ्टरचा वार केल्याने भागवत फासे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचा मुलगा निना भागवत फासे ( वय ३०) याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींने ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

Hot Chocolate : लहान मुलांसाठी १० मिनिटांत घरच्या घरी बनवा टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT