Annaatthe : रजनीकांत पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'अन्नत्थे' चा ट्रेलर रिलीज

सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाची सर्वच जनता उत्सुकतेने वाट पाहात असते.
Annaatthe : रजनीकांत पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'अन्नत्थे' चा ट्रेलर रिलीज
Annaatthe : रजनीकांत पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'अन्नत्थे' चा ट्रेलर रिलीजSaam Tv
Published On

सुपरस्टार रजनीकांत Rajnikant यांच्या चित्रपटाची सर्व जनता उत्सुकतेने वाट पाहात असते. त्यांची हिरो स्टाइल आणि अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकताच रजनीकांत यांनी आपल्या चहात्यावर्गाला एक दिवाळी भेट दिली आहे. रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'अन्नत्थे' या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर Social Media शेअर केला होता.

या चित्रपटात, रजनीकांत यांचा सोबत प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण हे हैद्राबादमध्ये झाले आहे तर काही भागाचे चित्रीकरण हे कोलकतामध्ये पार पडले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता धनुष, शिवकार्तिकेयन, खुशबू सुंदर, धनंजयन, साक्षी अग्रवाल या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना त्यांच्या 'अन्नत्थे' या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com