बापरे! राज्यातील 10 मंत्री, 20 आमदारांची टेस्ट पाॅझिटिव्ह; अजित पवारांची माहिती Saam Tv
महाराष्ट्र

बापरे! राज्यातील 10 मंत्री, 20 आमदारांची टेस्ट पाॅझिटिव्ह; अजित पवारांची माहिती

कोरोनानंतर आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : कोरोनानंतर (Covid19) आता ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहेत. लग्न सोहळे (Wedding ceremonies), राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने (State Government) नुकतेच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

मात्र, मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित (Corona) झाले आहेत. याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अजित पवार यांनी दिलेल्या माहितीने चिंतेत मोठी भर पडली आहे. शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव (Bhima-Koregaon) याठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी राज्यातील राजकीय मंडळींना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

त्यानुसार तब्बल 10 मंत्री (Minister) आणि 20 (MLA) आमदारांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. यामध्ये अनेक आमदार, मंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या लग्न समारंभांना देखील त्यांनी हजेरी लावली होती. या सर्व मंत्री आणि आमदारांच्या संपर्कात हजारो लोक आले आहेत. त्यामुळे ही सर्व राजकीय मंडळी कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू लागले आहेत.

कोरोनाचा संसर्गा झालेल्यांमध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काही अन्य काही मंत्री, आमदार आणि दिग्गज राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT