माथेरानच्या भाजपवासी 'त्या' नगरसेवकांचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात
माथेरानच्या भाजपवासी 'त्या' नगरसेवकांचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात Saam TV
महाराष्ट्र

माथेरानच्या भाजपवासी 'त्या' नगरसेवकांचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

माथेरान नगरपरिषदेचे भाजपवासी झालेल्या दहा नगरसेवकांचा फैसला आता रायगड जिल्हाधिकारी याच्या आदेशानंतर होणार आहे. आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर याच्या समोर दोन्ही पक्षाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा जिल्हाधिकारी यांच्यासमोरचा युक्तिवाद पूर्ण केला आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीची पुढची तारीखही पक्षकारांना दिलेली नाही. त्यामुळे आता भाजपवासी नगरसेवकांचा फैसला हा जिल्हाधिकारी यांच्या निकालावर अवलंबून राहिला आहे. आज माथेरान नगरसेवकांच्या बाबतीत निकाल जिल्हाधिकारी देणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे याकडे रायगडकरांचे लक्ष लागले होते. मात्र ही चर्चा फोल ठरली आहे.

माथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेचे दहा नगरसेवक यांनी मे महिन्यात कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. याबाबत शिवसेनेतर्फे पक्षांतर बंदी कायद्यानुसार रायगड जिल्हाधिकारी याच्याकडे तक्रार केली होती. शिवसेनेच्या तक्रारीनुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर गेली सहा महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सूनवणीनंतर आज 26 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर निकाल देतील अशी चर्चा होती. मात्र आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. दोन्ही वकिलांनी आधीच्या निर्णयाचे पुरावे जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. मात्र निर्णय अजून राखून ठेवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर याच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी भाजपवासी नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक, दोन्ही पक्षाचे वकील सुनावणीला उपस्थित होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी हे काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव

Maharashtra Politics 2024 : 'दक्षिण भारतात भाजपच्या १० जागाही येणार नाहीत'; आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

Health Tips: वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचे करा अशापद्धतीने सेवन, दिसेल लवकर रिझल्ट

SCROLL FOR NEXT