Maharashtra Election: बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या भिडणार? युगेंद्र पवारांची अजित पवारांशी लढत? saam
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या भिडणार? युगेंद्र पवारांची अजित पवारांशी लढत?

Baramati Election : बारामती विधानसभेसाठी अजित पवारांची उमेदवारी जाहीर झालीय.. मात्र पवार दादांविरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. पवारांचा हा डाव काय आहे? याबरोबरच बारामतीत कशी लढत होणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राज्यातील हाय होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीतून अजित पवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांचा पराभव करण्यासाठी नातू युगेंद्र पवारांना एबी फॉर्म दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढत होणार हे स्पष्ट झालंय...मात्र या लढतीने अजित पवारांची कोंडी होणार आहे? ती नेमकी कशी? पाहूयात.

पवारांचा डाव, दादांवर घाव ?

अजित पवारांना राजकीय गुरू शरद पवारांचं आव्हान

युगेंद्र पवारांना शरद पवारांनी मैदानात उतरवलंय

बारामतीत लोकसभेला सुळेंना 47 हजार मतांचं लीड मिळालं होतं

बारामतीची निवडणूक दादांसाठी अस्तित्वाची लढाई

बारामतीत अडकून पडल्यास राज्यभरातील प्रचारावर मर्यादा येण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना होम पिच असलेल्या बारामतीतच धक्का बसला.. बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. यामध्ये सुळेंना बारामतीतून मिळालेलं लीड सर्वाधिक आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीतून लढणार नसल्याचं म्हटलं होतं.

मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अजित पवार मैदानात उतरले आहेत. तर अजित पवारांना पाडायचंच असा पवारांनी निर्धार केल्याची चर्चा रंगलीय..त्यामुळे एकाच तालमीत धडे गिरवलेले काका पुतण्यांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागलंय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: काहींना मिळणार प्रेमात धोका, तर काही करतील सुखी संसार; वाचा तुमचे राशीभविष्य

Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

Cm Shinde: मुख्यमंत्री गुवाहाटीला का जातात? कामाख्या शिंदेंना पावणार?

Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO

Mahim Assembly Constituency : 'राज'पुत्र चक्रव्यूहात? माहिम मतदारसंघात पुतण्याची काकांकडून कोंडी? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT