Maharashtra Politics SAAM Digital
Maharashtra Assembly Elections

Wardha News: उमेदवारीचा घोळ! शुभेच्छांचे संदेश व्हायरल झाले अन् तासाभरात डिलीटही केले; नेमकं काय घडलं?

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ४ ऑक्टोबर

Maharashtra Assembly Election News: वर्धा जिल्ह्याच्या चार विधानसभा पैकी एका जागेवर शिंदे गटाने दावा ठोकला आहे.तीन मतदारसंघवार भाजपा आमदार असल्याने ती जागा भाजपाच्या वाटेला येणार हे निश्चित आहे तर देवळीच्या जागेवर रस्सीखेच सुरु आहे. अशातच देवळी विधानसभा मतदार संघात गुरुवारी दुपारदरम्यान देवळीची जागा भाजपच्या वाट्यात आली असून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराच्या नावाने शुभेच्छा संदेश सुद्धा सोशल मीडियावर पडू लागले, पण काही तासातच हे संदेश डिलीट करण्यात आले. एवढंच नव्हे तर इच्छुक उमेदवाराला सुद्धा या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावे लागले. नेमकं काय घडलं? वाचा...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी वर्धा जिल्ह्याच्या नेत्यांसाह देवळी विधानसभेतील प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. भेटीत चर्चा देखील झाली. देवळी विधानसभा मतदारसंघात अनेक पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहे.या भेटीनंतर काही वेळेतच सोशल मीडियावर देवळी विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली असून इच्छुक असलेले भाजपच्या देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष यांना उमेदवारी मिळाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले.

संदेश व्हायरल होताच कार्यकर्त्यांनी सगळीकडे शुभेच्छांचा वर्षावही सुरु केला पण काही तासातच हा संदेश ग्रुपवरून डिलीट करण्यात आला. एवढंच नव्हे तर इच्छुक असलेल्या देवळी पुलगाव विधानसभेतील त्या उमेदवाराने कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, भाजपा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. उमेदवारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदीय समितीचा आहे मी शिस्तबद्ध कार्यकर्ता असून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करून नक्कीच पार्टी माझा विचार करेल परंतु उमेदवारीची एक प्रक्रिया आहे व यावेळेस महायुतीला विजयी करण्याचा संकल्प घेतला आहे, असे स्पष्टीकरण द्यावे लागले.

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत देवळी विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली होती तेव्हा भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केली होती. यावेळेस देवळी विधानसभेवर शिंदे गटाने दावा केला असून शिंदे गटाचे नेते मतदारसंघाचा दौरा करत आहे. या मतदारसंघात भावना गवळी यांची निरीक्षक पदी नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश इखार या जागेसाठी शिंदे गटाकडून इच्छुक आहे.यामुळे या जागेला घेऊन महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Accident: दुचाकीला कट मारल्याने झाला वाद, दारूड्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले

VIDEO : 'त्यांना फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंगसाठी वेळ'; विरोधी पक्षाकडून सरकारवर टीकेची झोड

Maharashtra Politics : शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार

Women's T20 World Cup: वर्ल्डकप सामन्यात पेटला नवा वाद! रुमाल पडल्यामुळे फलंदाज राहिली नॉटआऊट; नेमकं काय घडलं?

Viral Video : नवरात्रीपुरते नाही तर इतर वेळी देखील महिलांना सन्मान द्या; तरुणाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT