Jharkhand Election yandex
Maharashtra Assembly Elections

Jharkhand Election: झारखंड विधानसभेसाठी आज मतदान, वायनाडसह ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वोटिंग

Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ४३ जागांसाठी मतदान होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय १० राज्यांतील ३३ विधानसभा जागांवर आज पोटनिवडणूकही होणार आहे. केरळच्या वायनाड लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा आणि महुआ माजी या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून रिंगणार आहेत.

८१ सदस्यीय झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४३ जागांवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. एकूण २.६० कोटी मतदारांपैकी १.३७ कोटी मतदार मतदान करणार आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सीसीटीव्ही नियंत्रण बसविण्यात आले आहे.

मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची मोठी जबाबदारी आहे. यावेळी मतदान केंद्रावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहे. मतदान सुरु होण्यापूर्वी जेएमएमचे प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. जनतेचा पूर्ण आर्शिवाद असेल आणि पाठिंब्याची कमतरता भासणार नाही असेही ते म्हणाले. आम्हाला प्रेम आणि मतेही मिळतील. मतदार आम्हाला ओळखतात.

झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. दरम्यान, रांची महुआ माजी येथील जेएमएमचे उमेदवार म्हणाले, 'मी जनतेला मला मत देण्याचे आवाहन करीन. तुमच्या शहाराचा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. आम्हाला संधी द्या. मी या शहराच्या आणि राज्याच्या विकासात मोठे योगदान देईन. मलाही आयटी क्षेत्राला रांचीमध्ये आणायचे आहे, जेणेकरुन येथील युवक या राज्याच्या विकासात योगदान देऊ शकतील असे स्वप्न आम्ही पाहिले आहेत. ते पूर्ण करु शकतो' असे ते म्हणाले.

Written By: Dhanshri Shintre.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT