Mahayuti Seat Sharing : Mahayuti Seat Sharing :
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Suspense over Mahayuti seat-sharing deal : महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहे, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण महायुतीचं जागाटप नक्की कुठे उडलेय? कोणत्या पक्षाची मागणी काय आहे?

Namdeo Kumbhar

Mahayuti Seat Sharing : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. विभागानुसार त्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. जागा वाटपाच्या चर्चेलाही वेग आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे जागावाटप ८० टक्के पूर्ण झाल्याचं म्हटले. पण फॉर्मुला अद्याप ठरला नसल्याचे समोर आलेय.

अमित शाह यांच्या विदर्भ दौऱ्यात महायुतीचा जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. २३-२४ सप्टेंबर रोजी अमित शाह मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी महायुतीची महत्वाची बैठक पार पडणार आहे, त्यामध्ये जागावाटपाचा तिढा सुटेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण जागावाटपाचं घोडं कुठे अडले, कोणत्या पक्षाने काय मागणी केली? याबाबत पाहूयात..

कोणत्या पक्षाला काय हवं? कुठे अडले घोडं?

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीचे सध्या १८६ विद्यमान आमदार आहेत. ते सिटिंग गेटिंग फॉर्म्यूल्यानुसार त्या त्या पक्षाला मिळतील, असे म्हटले जातेय. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ मतदारसंघाबाबत अडचणी आहेत. कारण, महायुतीमधील दोन्ही पक्षांनी त्यावर दावा ठोकलाय, त्यामुळे पेच निर्माण झालाय.

दुसरं मोठं कारण म्हणजे, काही मतदारसंघात २०१९ मध्ये तिन्ही पक्षांपैकी एका पक्षाने खूप कमी फरकाने जागा गमावली होती. आशाप्रकारचे जवळपास १५-१६ मतदारसंघ आहेत. यावर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षानेही दावा केला आहे. त्यामुळे घोळ आहे.

तिसरं कारण.... भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये १५५ जागा हव्या आहेत. उर्वरित १३३ जागा शिंदेसेना आणि अजित पवारांना वाटून घेण्यास सांगण्यात आलेय. त्यात आणखी घोळ म्हणजे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १०० जागा हव्यात.. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७० जागा हव्यात.

अमित शहा तिढा सोडवणार ?

केंद्रीय मंत्री अमित शाह २३-२४ रोजी मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी जागावाटपावर चर्चा होणार आहे. २४ तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला ठरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उमेदवारांची घोषणा कधी? हेही ठरवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT