Sunil Shelke vs Bapu Bhegade Maval vidhan sabha Election News Sunil Shelke vs Bapu Bhegade Maval vidhan sabha Election News
Maharashtra Assembly Elections

Maval News : मावळ तापलं! शेळके आणि भेगडेंचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांची मध्यस्थी!

Sunil Shelke vs Bapu Bhegade: लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बापू भेगडे यांचे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

Sunil Shelke vs Bapu Bhegade Maval vidhan sabha Election News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचलाय. त्यातच मावळचे राजकारण तापलेय. मावळमध्ये सुनील शेळके आणि बापू भेगडे यांच्यात थेट लढत होत आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता कार्यकर्त्यांमध्येही टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रचारावेळी शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलेय. लोणावळ्यात दोन गटामध्ये संघर्ष झाला. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर आरोप प्रत्यारोपही झाले.

लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करायला आले होते. त्यावेळी लोणावळयातील राम मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळकेंनी भेगडेंवर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा केला.

शेळके आणि भेगडे यांचे शेकडो कार्यकर्ते जमल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही गटाकडून आरोपप्रत्यारोप केला. पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी लोणावळ्यातील वातावरण तापले होते.

बापू भेगडे यांच्याकडून मावळ तालुक्यातील जनतेला दहशत निर्माण केली जात आहे. जनतेबरोबर आता माझ्यावर देखील दहशत निर्माण करण्यात येत आहे. विरोधकांना कोणता मुद्दा नसल्याने दहशत निर्माण करून रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. बापू भेगडे यांनीही शेळके यांना प्रत्युत्तर दिलेय. मावळमध्ये भेगडे आणि शेळके यांच्यातील संघर्ष समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

Kalyan politics : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटाके; शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना खोचक सल्ला, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य; नवी मुंबईचाही गौरव, राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

SCROLL FOR NEXT