Maharashtra Assembly Elections

Sillod Politics: सिल्लोडचं महाभारत ! अब्दुल सत्तारांना ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांचं आव्हान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

वादग्रस्त वक्तव्य आणि राजकीय चिखलफेकीने चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सिल्लोड. अजंठा लेणी, मिरची आणि मक्याचं आगार असलेल्या सिल्लोड तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर अब्दुल सत्तारांची सिल्लोडवर मजबूत पकड असली तरी आता भाजपचे माजी सरचिटणीस सुरेश बनकरांनी ठाकरे गटात प्रवेश करत अब्दुल सत्तारांसमोर आव्हान उभं केलंय..मात्र 2019 मध्ये कुणाला किती मतं मिळाले? पाहूयात.

2019 मधील राजकीय गणित?

अब्दुल सत्तार- शिवसेना, 1 लाख 23 हजार 383 मतं

माणिकराव पालोदकर - काँग्रेस, 99 हजार मतं

24 हजार मतांनी सत्तारांचा विजय

अब्दुल सत्तारांनी सलग तीन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढवली असली तरी शिवसेनेतील फुटीनंतर सत्तारांपुढे आव्हानांची मालिकाच उभी ठाकलीय. तर सिल्लोडमधून कोण इच्छूक आहेत? पाहूयात.

अब्दुल सत्तार, आमदार, शिंदे गट

सुरेश बनकर, ठाकरे गट, इच्छूक

ज्ञानेश्वर मोटे, भाजप, इच्छूक

सांडू पाटील लोखंडे, भाजप, इच्छूक

सुनील मिरकर, भाजप, इच्छूक

भास्कर घायवट पाटील, काँग्रेस, इच्छूक

ठगणराव पाटील भागवत, ठाकरे गट, इच्छूक

रंगनाथ काळे, राष्ट्रवादी (SP), इच्छूक

मराठा, मुस्लीम, राजपूत, बंजारा आणि ओबीसी समाज अशी जातीय समीकरणं असलेल्या सिल्लोड मतदारसंघावर अब्दुल सत्तारांचं वर्चस्व होतं. मात्र मराठा आरक्षण आणि धार्मिक धृवीकरणाने अब्दुल सत्तारांपुढे अडचणींची मालिकाच उभी राहिलीय.

सिल्लोडमध्ये हिंदू-मुस्लीम धृवीकरणाचा फटका बसण्याची शक्यता

रावसाहेब दानवेंविरोधात 27 हजार मतं गेल्याने भाजपमध्ये सत्तारांविरोधात नाराजी

मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्तारांसाठी डोकेदुखी ठरणार

बंडखोरी शमवण्याचं सत्तारांपुढे मोठं आव्हान

सत्तारांवर जमीन घोटाळ्याचे करण्यात आलेले आरोप

मिरची, मक्याचं कोठार असलेला सिल्लोड तालुका विकासाच्या बाबतीत मागे पडलाय..त्यामुळे मंत्रिपद भुषवणाऱ्या सत्तारांना भाजपचा विरोध आणि 2014 मध्ये अवघ्या 14 हजार मतांनी पराभूत झालेल्या सुरेश बनकरांचं आव्हान हे सत्तारांचा विजयी चौकार रोखणार का? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: मुलांसाठी ठाकरे एकत्र? माहीममध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नाही?

Flood Of Money: सांगलीत पैशांचा पूर; ओढ्याच्या पाण्यातून 500 रुपयांच्या नोटा आल्या वाहून

Maharashtra Election: मनोज जरांगेंचा उद्या अंतिम फैसला; कुणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?

Nushrratt Bharuccha: नुसरतच्या किलर लूकने उडवली सर्वांची झोप

Sunday Horoscope: रविवार 'या' 5 राशींसाठी ठरणार शुभ, देवी लक्ष्मीची होणार कृपा

SCROLL FOR NEXT