Maharashtra Politics Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : उमेदवारी मागे घेणार्‍या बंडखोराला एकनाथ शिंदेंचं गिफ्ट

Maharashtra Vidhan Sabha Election : उमेदवारी मागे घेणार्‍या बंडखोराला एकनाथ शिंदेंचं गिफ्ट

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : सोमवारी, राज्यभरातील काही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण काही जणांनी उमेदवारी कायम ठेवली. बंडखोरी कायम ठेवल्याचा फटका महायुती अन् मविआला बसणार आहे. काही जणांची बंडखोरी शमवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलेय. पालघरमधील बोईसर येथील बंडखोर जगदीश धोडी यांची तलवार म्यान करण्यात एकनाथ शिंदंना यश आलेय. बंडखोरी मागे घेताच एकनाथ शिंदे यांनी जगदीश धोडी यांना गिफ्ट दिलेय.

शिवसेना शिंदे गटातून बोईसर विधानसभेसाठी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून माघारी घेणाऱ्या जगदीश धोडी यांना एकनाथ शिंदे यांनी अन गिफ्ट दिलं आहे. बोईसर विधानसभेसाठी इच्छुक असलेले जगदीश धोडी यांना ऐनवेळी बोईसर विधानसभेची उमेदवारी नाकारून त्या ऐवजी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या विलास तरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जगदीश धोडी हे नाराज झाले होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून जगदी धोडी तीन दिवस नॉट रिचेबल होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जगदीश धोडी यांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीचं काम करून उमेदवार निवडून आणणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. इतकेच नव्हे तर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच जगदीश धोडी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावून उपनते पदावर त्यांची नियुक्ती केली. त्यांचे सहकारी वैभव संखे यांची सहसंपर्क प्रमुख पदी निवड करत अनोख गिफ्ट दिलं. या अगोदरच जगदीश थोडी यांना महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता उपनते पद देत जगदीश धोडी यांना डबल गिफ्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT