Satej patil, Maharashtra Assembly Elections 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सोमवार नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या क्षणी मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली अन् कोल्हापूरमधील वाद चव्हाट्यावर आला. काल नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता सतेज पाटील यांनी वादावर पडदा टाकलाय. छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहे, गादीचा सन्मान कायमच राखणार असे म्हणत सतेज पाटील यांनी वादावर पडदा टाकला.
कालच्या विषयावर पडदा टाकायचा निर्णय घेतलाय आहे. जे घडलं त्यावर आता बोलण्याची काही आवश्यकता वाटत नाही.
पुढे कसं जावं यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा करणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र येत बैठक झालेली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. पुढील दिशा आज संध्याकाळपर्यंत ठरेल, असे सतेज पाटील म्हणाले.
झालं एवढा भरपूर आहे, आता मला बोलून काही वाद निर्माण करायचा नाही. ज्या गोष्टी घडल्याचे समोर आहेत यावर आता पुन्हा मी बोलणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आहे, त्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे सतेज पाटील म्हणाले.
मी कोणतीही वैयक्तिक टिका टिपणी करणार नाही. मला आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गादीचा सन्मान ठेवणं हे महत्त्वाचं आहे, हे आहे आणि पुढे देखील राहील, असे सतेज पाटील म्हणाले.
शिरोळमध्ये वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्याचा आम्हाला फायदा होणार होईल. चंदगडमध्ये आम्हाला थोडं यश आलं. मात्र जिथे शक्य आहे तिथं माघार घेण्याचा प्रयत्न केला. पुढील पंधरा दिवस मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, यामुळे मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.