Mahayuti  Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

Maharashtra vidhan Sabha Election 2024 : वाई विधानसभा मतदार संघात महायुतीला धक्का बसला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी बंड पुकारलेय.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे उमेदवारी जाहीर होताच पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघामधून लढण्यासाठी अर्ज घेऊन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार पडलेय. (wai vidhan sabha constituency purushottam jadhav vs makarand patil)

वाई विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जर कोणत्याही पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढून निवडून येण्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले आहे. याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवून पुरुषोत्तम जाधव यांनी लाखांच्या घरामध्ये मते मिळवली आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांच्या उमेदवारीचा महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

प्रचाराला सुरुवात करताना पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेली अडीच वर्ष मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या मतदारसंघांमध्ये काम करत आहे. त्याच पद्धतीने गेली वीस वर्षे मी महायुतीबरोबर राहून संघर्ष केला आहे. चार वेळा निवडणुका लढलो आहे. परंतु सातत्याने मला डावलण्यात आले. मला घराणेशाहीचा वारसा नसल्यामुळे वारंवार थांबवण्यात येत आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यांच्या मुलाने राजकारणात यायचं की नाही? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

मी बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे, त्यामुळे हे युद्ध लढायचं आणि तेही जिंकण्यासाठी आता ठरवलं आहे. त्यामुळे मी आज अपक्ष अर्ज घेऊन आलो आहे. मकरंद पाटील यांच्या घरामध्ये सर्व सत्ता नांदत आहेत. जिल्ह्यामध्ये मकरंद पाटील यांचे एकच कुटुंब लायक आहे का? असा प्रश्न आता सर्वांना पडत आहे. कोणीही कितीही काहीही करू दे सर्व सामान्य जनतेच्या माध्यमातून मी लढणार आहे, असे जाधव म्हणाले.

वाई विधानसभेवरती सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार म्हणून जाणार. मला महायुतीचा रस्ता बंद झालेला आहे. माझ्यावर वारंवार अन्याय झाला आहे. त्यामुळे मी शरद पवार यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली आहे. शरद पवार माझा विचार करत आहेत. या आधी दोन निवडणुका मला आश्वासन देऊन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे आता यापुढे मला कोणीही फोन करून थांबा म्हणून सांगू शकत नाही. आज मी माझ्या निवडणुकीचा अर्ज आणला आहे आणि माझा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. काही जरी केलं तरी मी ही निवडणूक लढणारच आहे, असे जाधव यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार?

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

Top 10 Airports: जगातील सर्वात दिमाखदार टॉप १० विमानतळे, वाचा कोण कोणत्या देशाच्या एअरपोर्टचा समावेश!

Aditya Thackeray Net Worth: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

Pune Police: पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलं १३८ कोटी रुपयांचं सोनं

SCROLL FOR NEXT