balapur saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: बाळापूरमधून नितीन देखमुख होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

saam exit poll balapur : बाळापूरमध्ये विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचं पारडं जड दिसून येतंय. बाळापूरमधून शिवसेना ठाकरे गटाने नितीन देशमुख यांना उमेदवारी दिली होती.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पार पडलं. विधानसभेच्या या निवडणूकीचा निकाल परवा म्हणजेच २३ तारखेला लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? हे समजणार आहे. अशातच सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

यावेळी बाळापूरमध्ये विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचं पारडं जड दिसून येतंय. बाळापूरमधून शिवसेना ठाकरे गटाने नितीन देशमुख यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरूद्ध शिवसेना शिंदे गटाने बळीराम सिरसकर यांना उमेदवारीचं तिकीट दिलं होतं.

बाळापूर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देखमुख यांचं वर्चस्व राहिलंय. या ठिकाणी तब्बल ७० टक्के मतदान झालं आहे. एकंदरीत सकाळच्या एक्झिट पोलमधून मतदारांचा कल काही नितीन देशमुख यांच्याकडे दिसून आला. त्यामुळे बाळापूरचे संभाव्य आमदार नितीन देखमुख असू शकतात.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT