Amgaon saam tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: आमगावमधून संजय पुरम होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll Maharashtra : आमगाव मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढाई आहे. या लढाईमध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड होताना दिसतंय.

Surabhi Jayashree Jagdish

काल म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान करण्यात आलं होतं. यावेळी विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल २३ तारखेला लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? याचं संपूर्ण चित्र समोर येणार आहे. अशातच सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

आमगाव मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढाई आहे. या लढाईमध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड होताना दिसतंय. या ठिकाणी भाजपामधून भाजपकडून संजय पुरम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसमधून राजकुमार पुरम यांना तिकीट देण्यात आलं होतं.

सकाळच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहिली तर भाजपच्या संजय पुरम यांचं पारडं जड वाटतंय. या ठिकाणी महाविकास आघाडीने नवा चेहरा राजकुमार पुरम यांना संधी दिली. तर महायुतीने भाजपचे माजी आमदार संजय पुरम यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यावेळी २०१९ मध्ये पराभव स्वीकारूनही संजय यांनी कधी जनतेशी संपर्क तोडला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संजय पुरम हे संभाव्य आमदार मानले जातायत.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT