Melghat saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेळघाटात विधानसभा निवडणूकीचं चित्र कसं असणार आहे, हे पाहूयात. मेळघाटामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली होती.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतीच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. बुधवारी म्हणजेच २० तारखेला मतदान झालं आहे. यानंतर आता उद्या म्हणजेच २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोणता उमेदवार पडणार? असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत.

मेळघाटात विधानसभा निवडणूकीचं चित्र कसं असणार आहे, हे पाहूयात. मेळघाटामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली होती. यांच्याविरूद्ध भाजपाकडून केवळराम काळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. या ठिकाणी संभाव्य आमदार कोण हा प्रश्न समोर आला आहे.

मेळघाटात प्रहारचे राजकुमार पटेल यांचं पारड जड असल्याचं दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला चांगलाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मेळघाटामध्ये राजकुमार यांनी केलेल्या विकासकामामुळे यंदाच्या वेळी मतदारांचा त्यांच्या बाजूने कल लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनीत राणा यांनी काळे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यामुळे ही काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT