Sanjay Patil Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगावच्या मैदानात रोहित पाटीलही संजयकाकांना पुरून उरणार का? मतदारसंघात याची चर्चा सुरु आहे.

Namdeo Kumbhar

Tasgaon vidhan sabha Election 2024 : आर. आर. पाटील यांच्यामुळे राज्यात नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर आर आर पाटलांचे पारंपरिक राजरकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरले आहेत. यामुळे वडिलांचा विरोधक आता मुलाविरोधातही मैदानात उतरलाय. तासगावच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे.

पुन्हा आबा-काका गट आमनेसामने

तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीतील मतदारांना धक्का देण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून हातात घड्याळ बांधले आहे. त्यांना आज उमेदवारी मिळाली. २९ ऑक्टोबरला ते अर्ज दाखल करणार आहेत.

माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे. रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वडील आर. आर. पाटलांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढताय, असा टोला रोहित पाटलांनी संजय काकांना लगावलाय.

तासगावच्या मैदानात रोहित पाटीलही संजयकाकांना पुरून उरणार का?

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचा मुलगा रोहित पाटील रिंगणात उतरला आहे. माजी खासदार संजय पाटील पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी, मात्र त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर 2008 मध्ये विधानपरिषदेवर आमदारकी मिळाली. 2014 मध्ये भाजपात प्रवेश करून 10 वर्षे खासदार होते. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि रोहित पाटलांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजय काका पाटलांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा आबा आणि काका गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पारंपरिक विरोधक आमनेसामने आले आहेत. मात्र आपल्या वडिलांप्रमाणेच तासगावच्या मैदानात रोहित पाटीलही संजयकाकांना पुरून उरणार का? याकडे सा-या राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

SCROLL FOR NEXT