CM Eknath Shinde Saaam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Eknath Shinde Shiv Sena News : महायुतीचे बंडखोर शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनीधी

Maharashtra Assembly Elections 2024: बंडखोरी करणारे कल्याणमधील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महेश गायकवाड यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीचे भाजपाच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे महेश गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी घेणारे विशाल पावशे यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. कल्याण दिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यांचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालेय. शिवसेना पक्षावरोधात काम करणे, आदेशाचे पालन न करणे आणि मनमानी काम केल्यामुळे गायकवाड यांच्यासह दहा जणांचे पक्षातून निलंबण करण्यात आले आहे.

rebel Kalyan Sena Chief Mahesh Gaikwad and 9 other suspanded from eknath Shinde shiv sena Maharashtra Assembly Election

कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वरिष्ठांनी समजूत काढूनही महेश गायकवाड यांनी माघार न घेतल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महेश गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षाविरोधात काम करणे, आदेशाचे पालन न करणे व मनमानी पद्धतीने काम करण्याचा ठपका ठेवत महेश गायकवाड यांचे पक्षातून हकालपट्टी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख विशाल पावशे यांनी देखील वंचित कडून उमेदवारी घेत निवडणूक रिंगणात उतरलेत. विशाल पावशे यांची देखील हकलपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेविका सुशीला माळी ,माजी नगरसेवक शरद पावशे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे . महायुती विरोधात बंडखोरी केल्याने हे कारवाई करण्यात आली असून महेश गायकवाड व त्यांचे समर्थक तसेच विशाल पावशे व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT