Raj Thackeray 
Maharashtra Assembly Elections

Raj Thackeray: 'ही लाडकी बहीण योजना? महाराष्ट्रातही युपी बिहारमधील प्रकार सुरू; मुली नाचवण्यावरून राज ठाकरे संतापले

Raj Thackeray: शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या जाहीर सभेत मुली नाचवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावरून राज ठाकरेंनी सुनावलंय.

Bharat Jadhav

शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचार सभेत नर्तिकेचा कार्यक्रम झाल्यावरून राज्यभरातून टीका होतेय. अश्लील हावभाव असलेला डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेत मुली नाचवण्यात आल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. ते डोंबिवली येथील राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर एक महिला नाचत असल्याचे एक व्हिडिओ आपण पाहिला. हीच लाडकी बहीण योजना का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हे सगळं युपी बिहारची पद्धत आहे, आता आपल्याकडे सुरू झाल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय.

दरम्यान मुली नाचवण्याचा प्रकार रविवारी मंगेश कुडाळकर यांच्यासाठी घेण्यात आलेल्या सभेआधी घडला. मंगेश कुडाळकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ठाकरे गटाचे नेत्याने एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये एक महिला डान्सर अश्लील हावभाव करत नाचत असल्याचं दिसत आहे. यावरून टीका करतांना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा युपी बिहार करून ठेवलाय.

चाळीस आमदारांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे त्यावेळेला काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना असे बोलत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांना अचानक कळलं की अजित पवारही मांडीवर येऊन बसलेत. हे कोणतं राजकारण सुरू आहे . तरुण-तरुणी काम मागत आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय आणि यांची मज्जा सुरू आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर एक महिला नाचत असल्याचा एक व्हिडिओ आपण पाहिला हीच लाडकी बहीण योजना का असा? सवाल राज ठाकरेंनी केला.

आपण कुठे चाललो आहोत. मुली आणून नाचवायची युपी बिहारची पद्धत आहे. हे आपल्याकडे कधीच नव्हतं. पण आता आपल्याकडे सुरू झालंय. मला असं वाटतं की यात एकनाथ शिंदेंनी वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावतो. या असल्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्र वाचवणं महत्त्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

प्रत्येक पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोणता पक्ष टिकला किंवा नाही टिकला, पण महाराष्ट्र टिकणं गरेजचं आहे. महाराष्ट्र बरबाद होऊ नये. जर महाराष्ट्र बरबाद झाला तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता येणार नाही. ज्या छत्रपतींनी संपूर्ण राज्य उभं केलं, मान उभा केला. अटकेपार झेंडे फडकवले, असा इतिहास सांगणारा आपला महाराष्ट्र, आज व्यासपीठावर मुली नाचवतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT