Raj Thackeray In Kasaba 
Maharashtra Assembly Elections

Raj Thackeray: नगरसेवक असतो का? महापालिकेच्या निवडणुकांवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray In Kasba: राज ठाकरे यांनी कसब्यातील सभेत महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली.

Bharat Jadhav

चार-पाच वर्ष झाली महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत. नगरसेवक असतो हे लोकं विसरुन गेली आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर घाणाघात हल्लाबोल केलाय. राज ठाकरे कसब्यातील प्रचारसभेत बोलत होते.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यावरून आज राज ठाकरे यांनी सरकारचे कान उपटले आहेत. शहरांमध्ये वाढणाऱ्या लोंढ्यांवरून बोलताना ते म्हणाले. कसब्याची परिस्थिती खराब झालीय. छोट्या गल्ल्या, त्याला आकार उतार नाही. सगळ्याबाजुनं माणसं येतायेत. बदाबदा पडतायेत आणि मुळचे लोक वैतागलेत. ⁠मेट्रो येऊन किंवा फ्लायओव्हर बांधून शहरं सुधरत नाहीत. ही फक्त गॅझेट आहेत. सगळे मिळून शहराचा एकत्रित विचार करत नाहीत. आमच्याकडे काय सुरूय. राजकीय खेळ सुरूय.

मराठीचा मुद्दा

जितका कडवड मी हिंदुत्ववादी आहे तितकाच कडवट मी मराठी आहे. १०० - १५० केसेस माझ्यावर झाल्या आहेत. मोबाईल कंपन्यांनी मराठी सुरू केले. ते आंदोलन मनसेने केले होतं. येथे नोकऱ्या आहेत त्याच्या जाहीराती युपी बिहार मध्ये दिल्या गेल्या. ⁠प्रत्येकाला आपल्या प्रातांबद्दल प्रेम असतं. ⁠तुम्ही गुजरात मध्ये जाऊन शेत जमीन घेऊन दाखवा. तिथे शेती घ्यायची असेल तर माणुस तिथलाच लागतो. तरीही तुम्ही जमीन घेतली तर तिथे शेतीच करावी लागते. या महाराष्ट्रामधल्या सर्व मशिदींवरचे भोंगे उतरले पाहिजेत लोकांना त्रास देणारा कोणता धर्म असू शकत नाही.

महायुतीवर टीका

२०१९ ला शिवसेना भाजपसोबत होती. २०१९ ला दिलेलं ⁠तुमचं मत सध्या महाराष्ट्रात कुठे फिरतेय. शिवसेना फोडल्यानंतर शिंदे म्हणाले, अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. नंतर एक वर्षाने काय झाले, तेच अजित पवार मांडीवर येऊन बसले. मोदींनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेल मध्ये टाकू असं म्हटलं होतं. त्यानंतर दहा दिवसांनी तीच व्यक्ती महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री बनली.

उद्धव ठाकरेवर टीका

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, अडीच वर्षातील दीड वर्ष ते घरातून बाहेरच नाही पडले. ⁠सत्तेतील पक्षातील चाळीस आमदार निघून जातात आणि सत्ताधार्यांना कळलंच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT