Pravin darekar saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Assembly Election Result 2024: आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्विकारला पाहिजे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देंवेंद्र फडणवीस असतील असं त्यांनी म्हटलंय.

Surabhi Jayashree Jagdish

विधानसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलामध्ये महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महायुतीने २१५ आकडा पार केलाय. भाजपचे उमेदवार १२५ जागांवर आघाडीवर आहे. भाजपमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना निकालावर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलेय. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे. प्रवीण दरेकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रात महायुती २०० पार जाईल असं चित्र दिसून येतंय. माझ्या मताने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवी, बाजूने उभा आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठं यश मिळातंय. आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्विकारला पाहिजे.

मुख्यमंत्री फडणवीसच होणार

आता मु्ख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार आहे. जो पक्ष मोठा आहे त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात येते. भारतीय जनता पक्ष सवाशेच्या आसपास पोहोचणार असून भाजप मोठा पक्ष आहे.त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचा बनणार. यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असंही दरेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान निकालाचे आकडे पाहून संजय राऊत यांनी कुछ तो गडबड है असं विधान केलंय. यावर प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करावं लागणार आहे. आता तरी त्यांनी हवेतून खाली यायला हवं.

दरेकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत जो कौल दिला तो दुरुस्त करून भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आलं तर महाराष्ट्राचा अजून विकास होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

Agricultural Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो! सब्सिडीवर मिळेल ट्रॅक्टर,रोटाव्हेटर आणि ड्रोन; कसा कराल अर्ज?

Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT