Maharashtra Politics 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार?

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवू शकणारी मोठी बातमी. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी चाललंय असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केलाय.

Tanmay Tillu

महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीनंतर नव्या युत्या आघाड्या जन्माला येण्याची चर्चा रंगू लागलीय. मलिकांनी नेमका काय दावा केलाय आणि काय होऊ शकतं यावरचा हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. हे सा-या राज्यानं गेल्या पाच वर्षांत पाहिलंय. त्यामुळेच की आणखी नव्या युत्या आघाड्या जन्माला येण्याची शक्यता अजित पवारांचे उमेदवार नवाब मलिकांनी वर्तवलीय.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी चाललंय असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केलाय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात आहेत असा मोठा दावाही नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकर असतील असाही दावा नवाब मलिक यांनी केलाय. एका मुलाखतीत मलिकांनी हे खळबळजनक दावे केले आहेत.

मलिकांचा खळबळजनक दावा

शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी चाललंय

निवडणुकीनंतर अजित पवार किंगमेकर असतील

विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही

निवडणुकीनंतर कुणीही कुणाबरोबर येऊ शकतं

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले.

या सर्व पार्श्वभूमीनंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. राज्याच्या राजकारणात घडलेल्या अभुतपूर्व राजकीय नाट्यानंतर काहीही होऊ शकतं यावर मतदारांचाही विश्वास बसलाय. त्यामुळे मलिकांनी व्यक्त केलेली शक्यता दुर्लक्षित करुन चालणार नाही. कारण राजकारणात सारं काही शक्य असतं. आणि महाराष्ट्रात तर काहीही होऊ शकतं हे सा-या जनतेनं पाहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT