Uddhav Thackeray  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : मुंबईवरुन मविआत तिढा, ठाकरे-काँग्रेसकडून एकाचवेळी ६ जागांवर दावा, NCP ची भूमिका काय?

MVA Seat Sharing Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मविआमध्ये जागावाटपच्या चर्चेनं जोर धरला आहे. मुंबईतील ३६ जागासाठी काल मविआ नेत्याची बैठक झाली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Mva Seat Sharing Formula : जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या बैठकावर बैठका होत आहे. मुंबईतील ३६ जागांसाठी मविआमध्ये खलबतं सुरु आहेत. बुधवारी जागा वाटपावर बैठक पार पडली, पण तोडगा निघाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू राहणार आहे. मुंबईतील सहा ते सात जागांवर अद्याप तिढा कायम आहे.

मुंबईतला ३६ जागांचा जागावाटप जवळपास पूर्ण होत आली आहे. ज्या ६-७ जागांवर तिढा आहे अशा जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल. उर्वरित महाराष्ट्रातल्या जागावाटपवर सुद्धा चर्चा महाविकास आघाडीचे नेत्यांकडून केली जाती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप करताना जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे. त्या ठिकाणी कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत, त्यावर सुद्धा चर्चा केली जात आहे. त्यामुळे मेरिटनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटप केलं जात असल्याचं सांगण्यात आलंय. त्या नुसारच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर येईल.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने मुंबईत अधिक जागा मागितल्या आहेत. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ३६ विधानसभा जागापैकी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी एकसारख्याच सहा जागांवर दावा केला आहे. बुधवारी झालेल्या मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, एनसीपी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील, काँग्रेसकडून नाना पटोले आणि अतुल लोंढे सहभागी झाले होते.

शिवसेना ठाकरे गटाने २०, काँग्रेसने १८ आणि एनसीपी शरद पवार गटाने सात जागांवर दावा केला आहे. ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सहा जागांवर रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मविआमधील तिन्ही पक्ष कुर्ला, वर्स्वोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन जागासाठी आग्रही असल्याचे दिसतेय.

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची सहा जागांवर नजर

1. भायखळा

2. कुर्ला

3. घाटकोपर पश्चिम

4. वर्सोवा

5. जोगेश्वरी पूर्व

6. माहिम

त्याशिवाय मुलुंड, विलेपार्ले, बोरीवली, चारकोप आणि मालाबार हिल या पाच जागांवरही चर्चा सुरु असलयाचं समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT