भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल सावंत आणि काँग्रेसच्या भगिरथ भालकेंनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पंढरपूरात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय. दुसरीकडे भाजपने समाधान औताडेंना संधी दिलीय.. तर मनसेने दिलीप धोत्रेंना रिंगणात उतरलंय. त्यामुळे पंढरपूरात लढत चौरंगी होणार हे स्पष्ट झालंय. तर धोत्रे आणि सावंतांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
राज्याची आध्यात्मिक पंढरी अशी ओळख असलेल्या पंढरपूर मतदारसंघाचं दिवंगत आमदार भारत भालकेंनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत समाधान औताडेंनी भारत भालकेंचा मुलगा भागिरथ भालकेंचा पराभव करत पंढरीत पहिल्यांदाच कमळ फुलवले. मात्र पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतांचं समीकरण कसं होतं? पाहूयात.
समाधान औताडे, भाजप, 1 लाख 8 हजार 700
भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस, 1 लाख 5 हजार 717
औताडेंचा 3 हजार 733 मतांनी विजय
भाजपच्या प्रशांत परिचारकांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी परिचारकांची समजूत काढल्याने परिचारकांचं बंड थंड झालंय. त्यानंतरही महायुतीसाठी पंढरपूरची वाट बिकट असल्याचं म्हटलं जातंय.मात्र त्याची कारणं काय? पाहूयात.
पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध
लोकसभेला प्रणिती शिंदेंना 42 हजार मतांचं लीड
भालके आणि सावंतांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार हे स्पष्ट झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी समाधान औताडेंच्या पथ्यावर पडून पंढरपूरचा विठ्ठल औताडेंना पावणार का? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.