Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: अपक्षांच्या हाती सत्तेची किल्ली? महाराष्ट्रातही चालणार हरियाणा पॅटर्न?

Maharashtra Election: विधानसभेच्या 288 जागांसाठी तब्बल 8 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यामध्ये कोणत्या पक्षाचे किती बंडखोर आहेत? याबरोबरच हे बंडोबा कुणाचा खेळखंडोबा करणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर , साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीचा फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे बंडखोरांनी महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवलीय. महाराष्ट्रातही बंडखोरीच्या हरियाणा पॅटर्नची चर्चा रंगलीय. मात्र हा हरियाणा पॅटर्न काय आहे? पाहूयात.

काय आहे हरियाणा पॅटर्न?

हरियाणा काँग्रेसमध्ये भुपेंद्र हुडा विरुद्ध कुमारी शैलजांमधील वादाचा फटका

काँग्रेसमधील वादामुळे बंडखोरांची संख्या वाढली

बंडखोरी वाढल्याने मतफुटीचा काँग्रेसला फटका

राज्यातील 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांचा समावेश आहे. त्यापार्श्वभुमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरी शमवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या तब्बल 180 पेक्षा जास्त उमेदवारांनी बंडाचं निशाण फडकवलंय. त्यात कोणत्या पक्षाचे किती बंडखोर रिंगणात आहेत? पाहूयात.

महायुतीचे बंडखोर

शिंदे गट - 16

भाजप- 60

राष्ट्रवादी (AP) - 13

महाविकास आघाडीचे बंडखोर

काँग्रेस - 47

ठाकरे गट- 25

राष्ट्रवादी(SP)- 21

महायुतीने 284 तर महाविकास आघाडीने 286 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यातच अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी AB फॉर्म दिले आहेत. त्यातच महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार नसल्याचं मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय.. तर महायुतीत काही जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे बंडखोरीचा हरियाणा पॅटर्न कुणाच्या पथ्यावर पडणार? यावर सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT