Maharashtra Politics  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: ठाणे-कोकणात मविआला मोठा धक्का, फक्त १० जागांचा अंदाज, सर्व्हेचे आकडे काय सांगतात?

Maharashtra Assembly Polls 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीआधी आलेल्या नव्या सर्व्हेने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. पण या सर्व्हेत कोकण आणि ठाण्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics Survey: राज्यात दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात राजकीय सभांचा धडका सुरु आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता एक सर्व्हे समोर आलाय.

लोकपोलचा सर्व्हेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले असा अंदाज लोकपोलच्या ताज्या सर्व्हेतून समोर आला आहे. पण ठाणे आणि कोकणात मात्र महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात ठाकरेंची ताकद कमी झाली का ?

उद्धव ठाकरे आणि कोकण असे समिकरण होतं. पण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना कोकण आणि ठाण्यात जोरदार धक्का बसला. नारायण राणे, सुनील तटकरे, श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करत दिल्ली गाठली. लोकसभेत ठाकरेंना जोरदार धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे आणि मविआलाच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. कारण, कोकण आणि ठाण्यात महायुतीला मोठं यश मिळू शकते, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त कऱण्यात आलाय.

कोकण-ठाण्यात मविआला किती जागा मिळणार ?

कोकण आणि ठाण्यात विधानसभेच्या ३९ जागा आहेत. पण गतवेळपेक्षा यावेळी ठाकरेंना येथे धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकपालच्या ताज्या सर्व्हेनुसार, कोकण आणि ठाण्यात महाविकास आघाडीला ५ ते १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीला कोकणात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा प्रभाव आहे. तर कोकणात नारायण राणेंची ताकद आहे. त्याशिवाय रायगडमध्ये तटकरेंचा बोलबाला आहे. या ३ नेत्यांचा सामना करणं मविआला जड जात असल्याचे दिसतेय. कोकण आणि ठाण्यातील ३९ पैकी २५ ते ३० जागा महायुती जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Maharashtra Assembly Elections 2024 Survey

लोकपोलचा सर्व्हे, महायुतीला धक्का?

महायुती

115 ते 128

मविआ

141ते 154

इतर

5 ते 18

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

SCROLL FOR NEXT