Ramtek Assembly Constituency  Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : बावनकुळे झोपले आहेत का? शिंदेंचा उमेदवार ठरताच भाजप पदाधिकारी खवळले

Ramtek Assembly Constituency : शिंदे कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करतात. चंद्रशेखर बावनकुळे झोपले आहेत का? असा संतप्त सवाल, भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उपस्थित केला.

Satish Daud

Maharashtra Politics News : एकीकडे महायुतीत जागावाटपावरुन खलबंत सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला. रामटेक विधानसभा मतदारसंघातून शिंदेंनी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या निर्णयावर भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शिंदे कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करतात. चंद्रशेखर बावनकुळे झोपले आहेत का? असा संतप्त सवाल, भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उपस्थित केला.

त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपामुळे महायुतीत चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने ७ जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच कॉन्फिडन्स वाढला. आगामी विधानसभेत शिवसेनेला महायुतीतून किमान १०० जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळेच जागावाटपाचा निर्णय लांबणीवर पडल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रामटेकमधील पारशिवणी विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ४ वेळचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना आपल्या पक्षात सामील करून घेतली. इतकंच नाही तर सर्वांसमोर त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा देखील केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे रामटेकमधील भाजपचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी नाराज झाले.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळता भाजप उमेदवाराविरुध्द निवडणूक लढणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी तातडीने रद्द करावी, अशी मागणीच भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात आणि आम्हाला विश्वासात न घेता थेट जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करतात. चंद्रशेखर बावनकुळे झोपले आहेत का? असा संतप्त सवालही रेड्डी यांनी उपस्थित केला.

आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीचा पुन्हा विचार करावा. त्यांनी आम्हाला सलग ५ वर्ष त्रास दिला असून रामटेकमध्ये एकाही रुपयांचा निधी दिला नाही. त्यांनी आमची कामे होऊच दिली नाही. त्यामुळे आम्ही युतीधर्म पाळून त्यांची कामे कसे करणार? असंही रेड्डी म्हणाले. दरम्यान, भाजपच्या मसनर कार्यालयात स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर सामूहिक राजीनामे टाकू, असा इशाराही देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

SCROLL FOR NEXT