Pankaja Munde Dhananjay Munde Saamtv
Maharashtra Assembly Elections

Pankja Munde: 'डोळ्यासमोर कमळ, पण दाबा घड्याळाचं बटण', धनंजय मुंडेंसाठी पंकजा मुंडेंनी परळीकरांना घातली साद

Assembly Election: परळीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. धनंजय मुंडेंसाठी त्यांच्या बहिण पंकजा मुंडे मैदानात उतरल्यात. तुमच्या डोळ्यासमोर कमळ येईल पण घड्याळाचं बटण दाबा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

बीड हा राजकीयदृष्ट्या संवेदनशिल जिल्हा आहे. लोकसभेला मराठा आरक्षण फॅक्टर महत्वाचा ठरल्यानं पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता परळीतून त्यांचे बंधू कृषीमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून रिंगणात आहेत. परळीत धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मैदानात उतरल्यात. त्यांनी धनंजय मुंडेंना मतदान करण्याचं आवाहन करताना तुमच्या डोळ्यासमोर कमळ येईल पण घड्याळाचं बटण दाबा असं आवाहन केलंय. धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलंय.

आधी रेणापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी पाचवेळा विजय मिळवला. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोनदा परळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मागील काही काळापासून मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातूनही ते बीडमध्ये गावोगावी गेले आहेत. विशेष म्हणजे देशमुख यांच्या उमेदवारीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न केल्याचं राजकीय जाणकार सांगतात. परळी मतदारसंघात 1 लाख 14 हजार मराठा मतं आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण फॅक्टर महत्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT