Pune Khadakwasla Constituency 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: चमकणारा लोकप्रतिनिधी नको तर.., पुण्यातील मतदारांचा जाहीरनामा सोशल मीडियावर व्हायरल

Pune Khadakwasla Constituency : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांचा नव्हे तर मतदारांचा जाहिरनामा सध्या चर्चेत आहे. पाच पानांचा असलेला हा जाहीरनामा सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील मतदारांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. उमेदवारांनी कोणते कामे करावेत या कामांची यादी या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलीय. मतदारांचा पाच पानांचा असलेला हा जाहीरनामा सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

खडकवासला चौपाटी विकास, रिंग रोड, खेड शिवापूर टोल नाका, व्यावसायिक सुलभता रस्त्यांची बांधणी करणे. अनधिकृत बांधकाम आणि नियमित करणे, हे मुद्दे वाचून तुम्ही हा जाहीरनामा एखाद्या पक्षाचा असल्याचं म्हणाल. परंतु हा मतदारांनीच उमेदवारांनी मतदारसंघात कोणती कामे करावीत याचा जाहीरनामा आहे. चमकणारा लोकप्रतिनिधी नको तर मतदारांचे जीवन सुखकर करणारा प्रतिनिधी हवा असं देखील यात म्हटलंय.

पुढील सरकारच्या काळात जनतेला काय देणार याचा जाहीरनामा दोन्ही आघाड्याकडून प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनामा पाहून मतदार त्या पक्षाला निवडणुकीत सत्ता देत असतात. ज्याचा जाहीरनामा चांगला त्याला मतदार मते देतात. परंतु मात्र मतदारांनीच उमेदवारांसाठी जाहीरनामा जाहीर केलाय. मतदारासाठी उमेदवारांनी काय करावे , याचा जाहीरनामा पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील लोकांनी तयार केलाय.

मतदारांचा हा जाहीरनामा खूपच चर्चेत आलाय. मतदारसंघातील मुलभूत प्रश्नांसंदर्भात मतदारांनी हा जाहीरनामा लिहिलाय. पाच पानात हा जाहीरनामा तयार करण्यात आलाय. चमकणारा लोकप्रतिनिधी नको तर मतदारांचे जीवन सुखकर करणारा प्रतिनिधी हवा असाही उल्लेक जाहीरनाम्यात करण्यात आलाय. खडकवासला चौपाटी विकास, रिंग रोड, खेड शिवापूर टोल नाका, व्यावसायिक सुलभता रस्त्यांची बांधणी यासारखे विविध विषय जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलीय.

असा आहे जाहीरनामा

खडकवासला चौपाटी विकासः

खडकवासला चौपाटी वर पुण्यातून हजारो पर्यटक दररोज भेट देतात. येथील खाद्यपदार्थांच्या गाड्या, पार्किंग याची सोय करणे दृष्टीने तसेच पर्यटकांना रेंगाळणेसाठी लागणारी जागा यावर येथे बरेच काम करावे लागणार आहे.

आजच्या घडीला येथे कोणतेही नियोजन दिसून येत नाही. खडकवासला धरणालगत सिंहगड रोड लागत ज्या पद्धतीने चौपाटी विकसित झाली आहे त्याप्रमाणात ती दुसरे बाजूला कुडजे मांडवी येथे दिसून येत नाही. तरी या भागात ती कशी विकसित करता येईल आणि पर्यटकांचा लोंढा या भागात कसा विभागात येईल यावर काम होणे आवश्यक आहे.

CWPRS अतिरिक्त पडीक क्षेत्र

खडकवासला येथील CWPRS ही केंद्रीय संस्था मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन ताब्यात ठेऊन आहे. खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी तसेच धायरी आणि काही प्रमाणात नांदेड येथील नागरिकांना सध्या हक्काचे मैदान, गार्डन उपलब्ध नाही. तसेच खडकवासला धरण पर्यटकांना पार्किंग उपलब्ध नाही. CWPRS च्या ताब्यातील अधिकच्या जमिनीत या गोष्टी करणे सहज शक्य आहे. गरज आहे लोकप्रतिनिधींनी केंद्रीय स्तरावर सदर प्रस्ताव मंजूर करावे.

रिंग रोड :

पुणे प्रस्तावित रिंग रोडचे काम जलदगतीने पूर्णत्वास नेणे खूप आवश्यक आहे. तरी यावर आमच्या लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष घालणे आवश्यक आहे. पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वेल्हे कोंकण मार्ग :

वेल्हे रायगड कोंकण मार्ग जलदगतीने पूर्णत्वास न्यावा. यामुळे पुणे मधील पर्यटकांना कोकण मध्ये लवकर पोहोचणे शक्य होईल. तसेच ताम्हिणी मार्गावरील ताणही कमी होईल.

PMRDA प्लॅन अंमलबजावणी:

२०२१ मध्ये PMRDA प्लॅन सादर करण्यात आलाय. त्यावर सुनावण्या पूर्ण होउन ३ वर्षाहून अधिक काळ लोटलाय. परंतु अजूनही तो पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही. PMRDA प्रशासन, पालिका प्रशासन यांची उदासीनता आणि राजकीय क्षेयवाद यांमुळे आमचा विकास लांबतोय याची एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यास जाणीव असावी. त्यासाठी लागतील तितक्या मॅरेथॉन बैठका आपण घ्याव्यात.

व्यावसायिक सुलभता

जीएसटीचे भूत सध्या व्यापाऱ्यांच्या गळ्यातील फास बनलाय. जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे आवश्यक आहे. जीएसटीमधील बरेचसे नियम मोठ्याप्रमाणावर जाचक असून चोर सोडून संन्याशाला फाशी असे काहीसे आहे. यावर वेळेत सुधारणा आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: आज १०० हून अधिक खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

Rajesh Padvi: 'जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही'- नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांनी दिली प्रतिक्रिया

Prajakta Mali: 'फुलवंती' तुला पाहता शब्दही फुटेना...

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीने ठरवले 2 फॉर्म्युले, पाहा Video

Bhavin Bhanushali : अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलाचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT