नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदार संघात यंदा लक्षवेधी लढत होत असून महायुतीचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे,महाविकास आघाडीचे अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांच्यात होत असलेल्या या चुरशीच्या लढतीमुळे मालेगाव बाह्य मतदार संघ हा हॉट मतदार संघ बनलाय.
नाशिक जिल्ह्यातील हॉट मतदार संघां पैकी एक अशी ओळख बनलेल्या मालेगाव बाह्य मतदार संघात परंपरे प्रमाणे हिरे विरूध्द भुसे अशी लढत होत आहे.२००४ साली हिरे घराण्याकडून दादा भुसे यांनी हा मतदार संघ खेचून आणत आज पर्यंत त्यांनी तो आपल्या ताब्यात ठेवला आहे.त्यामुळे हिरे-विरूध्द भुसे यांच्या कायमचे राजकीय वैर निर्माण झाले आहे.
दरवेळी दादा भुसे यांची साथ देणारे त्यांचे कट्टर सहकारी बाराबलुतेदाल संघटनचे संस्थापक बंडू काका बच्छाव हे गेल्या काही वर्षां पासून त्यांच्या पासूवन दूरावले मात्र यंदा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आहे. आपण आजपर्यंत करोना काळाबरोबरच समाजातील तळागाळातील लोकांना केलेल्या मदतीच्या जोरावर आपण जनतेसमोर जात असून जनता आपल्याला नक्कीच निवडून देईल असा विश्वास अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांनी केलाय
आजपर्यंत आपण तालूक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास केलाय,शासनाच्या योजना जनते पर्यंत पोहचवत त्याचा लाभ त्यांना मिळवून दिलाय.तर आगामी काळात नार-पार व मालेगाव जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलय
मालेगाव बाह्य मतदार संघात दोन शिवसेनेत लढतच नसून शिवसेना आमची आहे,समोरचे बंडखोर आहे. भयमुक्त मालेगावसाठी आम्ही लढणार असल्याचं महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार अदव्य हिरे यांनी स्पष्ट केले.
२०१९ साली दादा भुसे यांना १,२१,२५२,कॉग्रेसचे तुषार शेवाळे यांना ७३,५६८ मत मिळाली होती.तर भाजपाचे पवन ठाकरे यांना ६९ हजार मत मिळाली होती. मालेगाव बाह्य मतदार संघात एकुण ३ लाख ७३ हजार मतदार असून यात रमजानपुरा,द्याने,संगमेश्वर भागातील मुस्लीम मतदारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.