Malegaon Politics Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Malegaon Politics: ना भाजप, ना राष्ट्रवादी, ना शिंदेंची शिवसेना, तरीही 'मालेगाव मध्य'मध्ये चौरंगी लढत

Maharashtra Assembly Election: मालेगाव मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात महायुतीने आपला उमेदवार दिलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय सोनवणे मनमाड(नाशिक), साम टीव्ही प्रतिनिधी

मालेगाव मध्य विधान सभा मतदार संघात यंदा चौरंगी लढत होत असून या ठिकाणी मात्र महायुतीने मात्र आपला उमेदवार न दिल्याने आर्श्चर्य व्यक्त केले जात आहे..

मालेगाव मध्य विधान सभा हा मुस्लीम बहुल असलेला मतदार संघ.या मतदार संघातून स्व.निहाल अहमद हे १९७८ साला पासून जनता दला तर्फे निवडून येत होते.मात्र २००० साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचे शिष्य असलेले रशिद शेख यांनी कॉंग्रेस तर्फे निवडणूक लढवली आणि त्यानंतर जनता दलाची अनेक वर्ष एक हाती असलेल्या सत्तेला सुरुंग लागला..

मालेगाव हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातून भाजपाने अनेक वेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न केला मात्र आज पर्यंत त्याला यश आले नाही.मागील वेळच्या विधान सभा निवडणूकीत भाजपाच्या दिपाली वारुळे यांना भाजपा तर्फे निवडणूकीच्या रिंगणात होत्या मात्र त्याला केवळ १४५० मत मिळाली तर २०२४ च्या लोक सभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांना एक गठ्ठा १ लाख ९८ हजार मुस्लीम समुदायाची मत मिळाल्याने महायुतीत भाजपाच्या वाट्याला आलेला मालेगाव बाह्य मतदार संघातून यावेळच्या निवडणूकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

यंदाच्या निवडणूकीत कॉंग्रेस कडून एजाज बेग,एम आय एम कडून विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल,समाजवादी पक्षाकडून शान-ए-हिद तर माजी आमदार आसिफ शेख यांनी स्वतंत्र स्थापन केलेल्या इस्लाम पक्षातून निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे.येथेही आघाडी ने कॉंग्रेस ने उमेदवार दिलेला असतांना समाजवादी कडून शान-ए-हिंद या निवडणूकीत उतरल्याने महाविकास आघाडीत फुट पडल्याच दिसून येतय.

२०१९ साली कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांना ७८,७२३ मत मिलाली तर एम आय एम पक्षाचे मौलाना मुफ्ती ईस्माईल यांना १,१७,२४२ इतकी मत मिळली आणि त्यांचा विजय झाला.

मालेगाव मध्य मध्ये 3 लाख 42 मुस्लिम मतदार आहे. हिंदू मतदार-१२००० आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navjot Singh Sidhu: नवज्योतसिंग सिद्धूचा कर्करोगाचा दावा किती खरा? टाटा मेमोरियल हॉस्पिटलने सांगितले सत्य

Pune Election Results: पुणे जिल्ह्यातून ४ नव्या आमदारांचे चेहरे; 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Shivsena UBT News : मातोश्रीवर आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक, काय होणार चर्चा? पाहा Video

Rakhi Sawant Real Name: बॉलिवूड 'ड्रामा क्वीन' राखी सावंत लावते दुसऱ्या वडिलांच नाव; खरं नाव आहे वेगळंच; कारण काय?

Government Job: सरकारी नोकरी अन् ८०,००० रुपये पगार; भारतीय खाद्य निगममध्ये बंपर भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

SCROLL FOR NEXT